उद्योगपतीकडून पुणे पोलिसांना 50 लाखांची मदत

पोलिसांच्या पाच मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

पुणे – करोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत कार्य करणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करताना त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत म्हणून पुण्यातील उद्योगपती व इंडो शॉट्‌ले ऑटो पार्ट प्रा.लि.चे अध्यक्ष विजय पुसाळकर यांनी 50 लाख रुपयांचा धनादेश पुणे शहर पोलीस दल कल्याणसाठी सोमवारी हस्तांतरित केला.

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या उपस्थितीत पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर, संघटनेचे समिती सदस्य कुमार ताम्हाणे, पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पुणे शहर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्‍त डॉ. संजय शिंदे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्‍त नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्‍त (प्रशासन) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्‍त स्वप्ना गोरे, मितेश गट्टे, पंकज देशमुख, सुहास बावचे, संभाजी कदम, पोर्णिमा गायकवाड आणि शिरीष सरदेशपांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल म्हणाले, “करोना काळात पोलीस दलाने विविध परिस्थितींचा सामना केला. यामध्ये वेगळ्या प्रकारची संचारबंदी, लॉकडाऊन अशा काळात कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकीची जबाबदारीपण बजावली.

Leave A Reply

Your email address will not be published.