नवी दिल्ली : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आज सकाळी आयईडीचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटामध्ये 4 पोलिस कर्मचारी आणि एक स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Manipur: 4 policemen and 1 civilian injured in an IED (Improvised explosive device) blast at Thangal Bazar in Imphal. Injured have been taken to hospital. pic.twitter.com/MEg2jCdA2A
— ANI (@ANI) November 5, 2019
मणिपूरच्या तंगाल बाजारमध्ये आयईडीचा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटात जखमी झालेल्या पोलिस आणि स्थानिक नागरिकांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.
या स्फोटानंतर पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आसपासच्या नागरिकांना घटनास्थळावरुन हलवले आहे. आयईडीचा स्फोट पोलिसांना लक्ष्य करुन करण्यात आला असल्याची माहिती सांगितली जात आहे. ज्याठिकाणी हा स्फोट करण्यात आला आहे त्याठिकाणी बिहारचे नागरिक जास्त संख्येने राहतात.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्विकारलेली नाही. पोलिसांकडून स्फोट घडवून आणलेल्यांचा शोध सुरु आहे.