मुंबई – राजस्थान रॉयल्स टीमचा स्टार फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने आयपीएल 16 व्या हंगामात 7 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात मोठा कारनामा केला आहे. युझवेंद्र चहल याने हैदराबादच्या 4 फलंदाजांना आऊट केलं.
यासह चहलने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. चहल आता आयपीएलमध्ये संयुक्तरित्या सर्वात जास्त विकेटस घेणारा गोलंदाज ठरला आहे. विशेष बाब म्हणजे या यादीच चहलचं नाव आघाडीवर असून त्याने कमी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, याआधी सर्वात जास्त विकेट्सचा विक्रम हा ड्वेन ब्राव्हो याच्या नावावर होता. मात्र चहलने आता ब्राव्होची बरोबरी केली आहे. चहल आणि ब्राव्हो या दोघांच्या नावावर प्रत्येकी 183 विकेट्सची नोंद आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याच्या यादीत ड्वेन ब्राव्हो हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. तर उर्वरित 4 हे फिरकीपटू आहेत.