मुंबई :- भारतात येत्या 5 ऑक्टोबर तेल 19 नोव्हेंवर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. त्यातील भारतीय संघाचा सहभाग नसलेल्या सामन्यांचीही तिकिटे विकली गेली आहेत.
या सामन्यांनाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ज्या दिवशी या तिकिट विक्रीला प्रारंभ झाला तेव्हाच ऑनलाईट तिकिट विक्रीची साईट क्रॅश झाली होती.
मात्र, त्यात सुधारणा केल्यावर ती पुन्हा कार्यरत झाली व काही वेळातच नॉन इंडिया सामन्यांचीही तिकिटे संपली. या स्पर्धेत प्रत्येक ठरावीक दिवशी काही तिकिटे बॉक्स ऑफिसवरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
विश्वकरंडक उद्घाटन 4 ऑक्टोबरला…
भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख बीसीसीआयने निश्चित केली आहे. स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 4 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी हा सोहळा होणार आहे.
या सोहळ्याबाबत अद्याप बीसीसीआयने आणखी कोणतीही माहिती घोषित केलेली नसली तरीही त्याबाबत लवकरच माहिती देण्यात येणार आहे.