लंडन : जागतिक क्रिकेटमध्ये सध्या सुरू असलेल्या स्पर्धांच्या बरोबरीने नवनव्या स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तयार केला आहे.
या प्रस्तावामागे आयसीसीचा जास्तीत जास्त नफा कमावण्याचा तर हेतू आहेच पण त्याचबरोबर विविध देशांत या स्पर्धा घेऊन क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढविण्याचा प्रयत्नही आहे.
साल २०२३ ते २०३१ या कालावधीत टी-२० चॅम्पियन्स करंडक, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय करंडक या नव्या स्पर्धांचे आयोजन करण्याचा विचार आयसीसी करत आहे.
टी-२० स्पर्धेत १० संघ ठेवण्यात येणार असून एकूण ४८ सामने होतील. आॅल प्ले आॅल व राऊंडराॅबीन स्वरूपात या स्पर्धा होतील.