T20 World Cup 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) आगामी टी-२० विश्वचषकासाठी बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे. यावेळी विजेत्या संघाला भारतीय रुपयांमध्ये सुमारे १३ कोटींपेक्षा अधिक रक्कम (१३,०५,३५,४४०) मिळणार आहे. यापेक्षा निम्मी रक्कम उपविजेत्या संघाला दिली जाणार आहे. १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत असून यामध्ये १६ संघ सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार आहे.
सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघाला भारतीय रुपयांमध्ये सुमारे ३,२६,२०,२२० कोटी रुपये दिले जातील. सुपर १२ मधील विजेत्या संघाला ३२,६२,०२२ रुपये तर सुपर १२ मध्ये पराभूत झालेल्या संघाला ५७,०८,०१३ रुपये दिले जातील. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे आठ संघ थेट सुपर १२ टप्प्यात पोहोचले आहेत. तर नामिबिया, श्रीलंका, नेदरलँड्स, यूएई, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या संघांना अगोदर पात्रता सामने खेळायचे आहेत. ( ICC has announced the T20 World Cup 2022 title prize money )
The prize pot for the 2022 #T20WorldCup in Australia has been revealed 👀
Full details 👇https://t.co/Vl507PynsJ
— ICC (@ICC) September 30, 2022
संघांना दिली जाणारी रक्कम ( T20 World Cup 202 )
विजेता संघ: रु. १३,०५,३५,४४० कोटी
उपविजेता संघ: रु. ६,५२,६४,२८० कोटी
उपांत्य फेरीतील संघ: रु. ३,२६,२०,२२० कोटी
सुपर 12 मध्ये विजेता संघ: रु. ३२,६२,०२२ लाख रुपये
सुपर-12 मध्ये पराभूत संघ: रु. ५७,०८,०१३ लाख
पहिल्या फेरीत विजयी संघ: रु. ३२,६२,०२२ लाख
पहिल्या फेरीत पराभूत झालेला संघ: रु. ३२,६२,०२२ लाख