मुंबई : आयएएस टीना दाबी आणि आयएएस प्रदीप गावंडे हे विवाहबंधनात अडकले आहेत. जयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणीच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. टीना आणि प्रदीप यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांचे रिसेप्शन जयपूरमधील बाइस गोडाऊन येथील प्रसिद्ध हॉटेल हॉलिडे इनमध्ये झाले.
टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या रिसेप्शनमध्ये अनेक बडे अधिकारी आणि राजकारणी लोकांनी हजेरी लावली होती. अनेक आयएएस, आयपीएस आणि राज्य सेवेतील अधिकारी या या कार्यक्रमाला उपस्थित होते. यासाठी हॉटेलमध्ये राजस्थानी पद्धतीची खास सजावट करण्यात आली होती.
टीना दाबी या सध्या वित्त विभागात सहसचिव आहेत. तर, प्रदीप गावंडे हे उच्च शिक्षण विभागात सहसचिव आहेत. दोघांनी अलिकडेच सोशल मीडियावर त्यांच्या नात्याचा खुलासा केला. टीना दाबी यांच्यासोबच लग्नाच्या बातमीनंतर प्रदीप गावंडे यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही झपाट्याने वाढ झाली.
सर्वात प्रसिद्ध IAS अधिकाऱ्यांच्या यादीत टीना दाबी यांचा समावेश आहे. सोशल मीडिया असो की मीडिया, त्या नेहमीच माध्यमांत चर्चेत असतात. टीना यांचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेस टॉपर टीना दाबी यांची त्याच वर्षी दुसरे टॉपर बनलेल्या अतहर यांच्याशी ओळख झाली.