Rupali Chakankar – काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील डेंग्यूग्रस्त झाले आहेत. जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अशात आज बुधवार १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाईल. भाऊबीजेचा सणा निमित्य आज अजित पवार गटातील नेत्या रुपाली चाकणकर यांनी जयंत पाटील यांना माझे बंधू जयंत दादा पाटील लवकरच बरे होतील अशा शुभेच्छा दिल्या आहे.
दरम्यान, आज भाऊबीज असून सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय नेते मंडळी सुद्धा भाऊबीज साजरी करतात. पंकजा मुंडे-धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे-अजित पवार या राजकीय क्षेत्रातील भाऊ-बहीणीच्या जोड्या सर्वांना माहित आहेत, तसेच यावर्षी जयंत पाटील हे रुपाली चाकणकर यांच्याकडे भाऊबीजेला जाऊ शकले नाहीत. कारण त्यांना डेंग्यूची लग्न झाली आहे. मात्र यावरून कुठलं राजकारण किंवा राजकीय मतभेद हे कारण नाहीये. स्वत: रुपाली चाकणकर यांनी याबद्दल माहिती दिलीय.
रुपाली चाकणकर म्हणाल्या,’आज माझे बंधू जयंत पाटील आजारी असल्यामुळे भाऊबीजेला येऊ शकले नाहीत. पण त्यांनी मला फोनवरून भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझे बंधू जयंत दादा पाटील लवकरच बरे होतील अशा शुभेच्छा” असं रुपाली चाकणकर यांनी म्हंटल आहे.