ICC Cricket World Cup 2023 #INDvNZ Semifinal Toss Update & Playing 11 : विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दुपारी 2 वाजता सामन्यास सुरूवात होईल.
जगभरातील करोडो चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत.या सामन्याशी भारतीय चाहत्यांचे भावनिक नाते आहे, कारण 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी टीम इंडिया आज न्यूझीलंडला हरवून त्या पराभवाचा बदला घेईल, अशी आशा चाहत्यांना आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा यानं नाणेफेक(Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकङे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननेही आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
IND vs NZ Live : दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे….
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
दरम्यान, गेल्या 20 वर्षांच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंड संघाने टीम इंडियावर वर्चस्व गाजवले आहे, परंतु यावेळी टीम इंडिया उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करू शकते. कारण सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील 8 सामने जवळपास एकतर्फी जिंकले आहेत. या विश्वचषकात भारताने सर्व 9 संघांचा पराभव केला आहे. या स्पर्धेतील साखळी लढतीत भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता व आता आज हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येत आहेत.