Bahubeej of Pawar family : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले.त्यानंतर बंडानंतर यंदाची पहिली दिवाळी आहे ज्यामध्ये सगळे पवार कुटुंब एकत्र दिसून येत आहेत. दरम्यान, काल दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंदबागेत अजित पवार गैरहजर राहिल्यानन्तर आज काटेवाडीत सुप्रिया सुळे भाऊबीज साजरी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागेल असताना आता काटेवाडीत सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आज काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थनी दाखल झाल्या आहेत.याठिकाणी त्या अजित पवारांसोबत भाऊबीज साजरी करणार आहेत. राजकीय मतभेद एका बाजुला आणि कौटुंबिक सलोखा आणि नाती एका बाजुला असे यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सुप्रिया सुळे या काटेवाडीत दाखल झाल्या आहेत.
यावर अजित पवार गटातील नेत्या रुपाली चाकणकर म्हणाल्या,’राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, पण नातेसंबंध आपापल्या ठिकाणी असतात. नात्यांमध्ये राजकारणाची गफलत करू नये. नाती जपली पाहिजेत, कुटुंब जोपासले पाहिजे. नाती जपली पाहिजेत, कुटुंब एकत्रित राहायला पाहिजे. बारामतीत सगळे एकत्र येत आहेत, याचा आनंदच आहे” असेही चाकणकर म्हणाल्या आहे.