नवी दिल्ली – महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान देण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही, असे टीकास्त्र राहुल गांधींनी आरएसएसवर सोडले आहे.
राहुल गांधी म्हणाले कि, माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांना संघ परिवार असे म्हणणे योग्य ठरणार नाही. परिवारमध्ये महिलांचा आणि वयस्कर व्यक्तींचा आदर केला जातो. या व्यक्तींविषयी आदर आणि प्रेमाची भावना असते. असे आरएसएसमध्ये दिसून येत आहे. यामुळे मी यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघ परिवार म्हणणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
मेरा मानना है कि RSS व सम्बंधित संगठन को संघ परिवार कहना सही नहीं- परिवार में महिलाएँ होती हैं, बुजुर्गों के लिए सम्मान होता, करुणा और स्नेह की भावना होती है- जो RSS में नहीं है।
अब RSS को संघ परिवार नहीं कहूँगा!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 25, 2021
दरम्यान, स्वत:चे कोठेही नाव न येऊ देता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. भाजपच्या माध्यमातून त्यांनी हे उद्योग चालवले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. आसामातील विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी बोलत होते.