मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील बालकलाकार गोगी म्हणजेच “समय शहा’ला अज्ञात माणसाकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली.
And this was the 3 time where they abused me but did not ran away but started talking rubbish and first time they threatened me.
But Thank you all for your love and support 🙌🏻
I truly believe on @MumbaiPolice— Samay Shah (@SamayShah48) October 30, 2020
या प्रकरणी बोरीवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्याचंदेखील म्हटलं जात होतं. मात्र, सत्य परिस्थिती वेगळीच असल्याचं समयने सांगितलं आहे. यासंदर्भात समयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझ्या कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही’ असं त्याने म्हंटलं आहे.
In many news channel there are rumours that I am been threatened since 15 days but that’s not true it was before lockdown wherein a man with his bike abused me and than ran away, second time they abused my mom and ran away.
— Samay Shah (@SamayShah48) October 30, 2020
जो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो आताचा नसून हा प्रकार लॉकडाउनपूर्वी घडलेला आहे असं समयने स्पष्ट केलं आहे. समयवर यापूर्वीदेखील असे काही हल्ले झाल्याचं त्याच्या आईने म्हटलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
समयची आई म्हणाली कि, ‘काही गुंड इमारतीच्या आवारात घुसले, त्यांनी समयवर हल्ला केला. याचा जाब विचारला असता गुंडांनी अश्लिल शब्दात शिवीगाळ केली. समयसोबत ही तिसरी घटना घडल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. समयच्या नातेवाईकांनी पोलिसात याबाबतची तक्रार केली आहे. शुटींगवरुन परतल्यानंतर 8.30 च्या दरम्यान ही घटना घडली. समयने या संदर्भातील एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.