उर्वशी रौतेला आपल्या फॅशन ट्रेन्डस आणि हॉट फोटो शूटसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याबरोबर ती स्वतःच्या फिटनेससाठी करायच्या वर्क आऊटसाठीही विशेष प्रसिद्ध आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी तिने आपला डाएट प्लॅन स्वतःच डिजाईन केला आहे. त्याचे अगदी काटेकोरपणे ती पालन करत असते. त्याचबरोबर ती जिममध्ये तासनतास वर्कआऊट करत असते.
उर्वशीने अलीकडेच स्वतःच्या वर्क आऊटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यामध्ये ती चक्क कमांडो पुलअप्स मारताना दिसते आहे. या पुलअप्सच्या व्यायामाचे वेगवेगळे फायदेही तिने लिहिले आहेत. पाठीचे स्नायू मजबूत होतात. हात आणि खांद्याच्या सांध्यांमध्ये ताकद येते.
हाताची पकड सुधारते आणि शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ कायम राखण्यासाठी मदत होते, असे उर्वशीने म्हटले आहे. व्हिडिओमध्ये तिने केवळ पाच कमांडो पुलअप्स मारताना दिसले आहे. मात्र, एवढ्या स्फूर्तीने पुलअप्स मारण्यासाठी सततचा सराव आवश्यकच आहे. त्याशिवाय पुलअप्स मारणे सहज शक्य होणार नाही, हे नियमित व्यायाम करणाऱ्यांना निश्चितपणे लक्षात येऊ शकेल.