‘मला वाटतं आता जगाला गुडबाय म्हणायची वेळ आलीये’

सचिन वाझेंच्या व्हॉटसअॅप स्टेटसनं खळबळ

मुंबई  – मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या वाहनाचे मालक मनसूख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.  त्यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. या घटना ताज्या अतानाच पुन्हा एकदा सचिन वाझे चर्चेत आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार. सचिन वाझे यांच्या बदलीनंतर त्यांनी ठेवलेल्या  स्टेटसमुळे  त्यांच्या मनात चाललंय काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करत चर्चा रंगली आहे. त्यांनी ठेवलेल्या स्टेटसमधील  मजकुरात मला वाटतं आता जगाला गुडबाय म्हणायची वेळ आलीये असा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या या स्टेटसमधील मजकुरामुळे  खळबळ उडाली आहे.

काय व्हाट्स अँप्स स्टेटसमधील मजकूर 

‘तीन मार्च २००४. साली मला खोट्या आरोपांखाली सीआयडीमधील काही जणांनी अटक केली होती. त्यावेळी माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता. आशा होती, धैर्य होतं, आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्ष शिल्लक होती. मात्र आता माझ्याकडे आयुष्याची पुढील १७ वर्षे शिल्लक नाही  तसेच नोकरीची एवढी वर्षे आणि अशा पद्धतीने जगण्याचं धैर्यही नाही. मला वाटतं जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय.’

दरम्यान, मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या वाहनाचे मालक मनसूख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याशिवाय मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. याच मुद्‌द्‌यावरून नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तपासानंतर निर्णय घेतला जाईल, असे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सांगितले होते.  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.