IT Raid – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील दोन व्यावसायिक समूहांविरुद्ध प्राप्तिकर विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सीबीडीटीने बुधवारी सांगितले की, 5 ऑक्टोबर रोजी दोन व्यावसायिक समूहांशी संबंधित सुमारे 100 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्या शोध मोहिमेनंतर विभागाने 32 कोटी रुपयांची रोकड आणि 28 कोटी रुपयांची सोन्याची नाणी जप्त केली आहेत.
बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या समूहांवर छापा टाकण्यात आला त्यापैकी एक समूह शैक्षणिक संस्था चालवतो आणि दुसरा समूह डिस्टलरी, औषधी, रुग्णालये आणि हॉटेल्स इत्यादींमध्ये गुंतलेला आहे. अधिकार्यांनी असेही सांगितले की, त्याच दिवशी आयकर अधिकार्यांनी द्रमुकचे खासदार एस. जगतरक्षक आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरावरही छापा टाकला होता.
सीबीडीटीने सांगितले की, दोन्ही समूहांविरुद्धच्या शोधात आतापर्यंत एकूण 60 कोटी रुपये रोख आणि सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत. कर मंडळाने आरोपी गट किंवा त्यांचे प्रवर्तकांची ओळख उघड केलेली नाही.