बीड : राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांचे कार्यकर्त्यांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. या दरम्यान शरद पवारांसह कार्यक्रमात अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांवर टीका केली, या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सक्षणा सलगर यांनी आक्रमक भाषण केलं. “आज ऐतिहासिक अशी सभा बीड जिल्ह्यात होत आहे. मी लहानपणापासून ऐकलय पवारसाहेबांचा सगळे पवारसाहेबांच वय काढतात, पण एका कवीने लिहून ठेवलय की, “आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. विचार बाकी आहे” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या,’बालेकिल्ला बीड जिल्हा. सगळे पवारसाहेबांच वय काढतात, पण एका कवीने लिहून ठेवलय की, “आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. विचार बाकी आहे” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.
दरम्यान, “माझं वय झाले म्हणतात, तुम्ही माझे काय बघितले? ठीक आहे तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचे आहे. पण निदान आयुष्यात ज्यांच्याकडून तुम्ही काही घेतले असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवण्याचा प्रयत्न करा. असे जर केले नाही तर लोक तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,’ असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला. राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांचे कार्यकर्त्यांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले.