मुंबई – बॉलीवूड कलाकार नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतात. सिनेक्षेत्रातील अनेक सेलेब्रिटींचा घटस्फोट झाला आहे. यातील अनेक जण घटस्फोटानंतर दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये किंवा विवाह करणार असल्याच्या बातम्या समोर येत असतात. यातच आता अभिनेता शाहरुख खानच्या 2017 साली रिलीज झालेल्या ‘रईस’ चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
याआधी माहिराचे नाव अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडले गेले होते. रणबीर कपूरसोबतचे तिचे स्मोकिंग करतानाचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. मात्र आता ती पुढील महिन्यात बॉयफ्रेंड सलीम करीमसह लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. अद्याप तिने दुसऱ्या लग्नाबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. पण अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. माहिरा आणि सलीम अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. माहिरा खान आणि सलीम करीम यांचे लग्न एका हिल स्टेशनमध्ये होणार असल्याचे म्हंटले जात आहे.
या लग्नासाठी कुटुंबीय आणि मित्रपरिवार असे मोजकेच लोक उपस्थित राहणार आहेत. माहिराचं आधी 2007 मध्ये अली अस्करीसोबत पहिलं लग्न झालं होतं. त्यानंतर 2009 साली तिने अजलान या मुलाला जन्म दिला. पण मुलाच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांच्यात वाद सुरू झाले आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 2015 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर 2017 मध्ये माहिरा आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र आता माहिरा सलीमसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सलीम हा एक प्रसिद्ध उद्योजक असून या दोघांची भेट एका इव्हेंटमध्ये झाली होती.