नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावरन एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली आहे. विमानतळावरील आयसोलेशन बे येथे विमानाची तपासणी सुरू आहे.
सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याबाबतचा कॉल आज जीएमआर कॉल सेंटरला आला होता.
Bomb threat on Delhi-Pune Vistara flight at Delhi airport. Inspection of the aircraft is underway in the isolation bay at the airport. All passengers along with their luggage have been deboarded safely. A call regarding a bomb on the flight was received by the GMR call centre…
— ANI (@ANI) August 18, 2023
दरम्यान, काही दिवसापूर्वी पुण्याच्या विमानतळावर एका वृद्ध महिलेनेही आपल्या अवतीभोवती बॉम्ब असल्याचे सांगत धमकी दिली होती.: ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे म्हणत पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका महिलेने दिली होती.
आश्चर्य म्हणजे ही धमकी एका ७२ वर्षी वृद्ध प्रवाशी महिलेने दिली आहे. या महिलेवर विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव होते.