मुंबई: राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. देशात प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत निलंबित भाजप प्रवक्त्यांनी वक्तव्य केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला टार्गेट केले जात आहे. त्यावरून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना सध्याच्या परिस्थितीत ‘मी मोदींच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे’ त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हंटले आहे.
ते म्हणाले देशात विखारी वातावरण बनवले जात असून यामुळे देशाची प्रतिमा खराब होत आहे. जागतिक पातळीवर देशाला प्रश्न विचारले जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत आहे. तर या गोष्टींचा देशाच्या विकासावर परिणाम होऊ नये यासाठी यांच्या मागे देश उभा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आली ही प्रतिक्रीया ट्वीटरच्या माध्यमातून दिली.
Today, I strongly stand behind my @PMOIndia and my country as a citizen first and an elected representative of this nation.
We will resolve our issues internally and the vicious attack on #India due to mistakes of a few is unwarranted.@narendramodi— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 7, 2022
पंतप्रधान केवळ व्यक्ती नसून एक इंन्स्टीट्यूशन
दरम्यान प्रेषित मोहम्मद प्रकरणाबाबत खासदार कोल्हेनी ही बाब खेदजनक असल्याचे म्हंटले आहे. तर पंतप्रधान हे केवळ व्यक्ती नसून ती एक इंन्स्टीट्यूशन आहे. या इन्स्टीट्यूशनचा मान राखला गेला पाहिजे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने पंतप्रधान पदाचा अभिमान हा बाळगळाच पाहिजे असे खासदार कोल्हे म्हणाले. तसेच माझ्या देशाच्या पंतप्रधानांचा कुणी अवमान करत असेल, तर या देशाचा नागरिक, लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असेही खासदार कोल्हे म्हणाले. कोल्हे यांच्या या वक्तव्यावरून मात्र अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. ऐन राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.