मुंबई – बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच त्याने ‘#Ask SRK ‘सेशन घेतले. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत. मात्र एका प्रश्नाला शाहरुखला दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला त्याच्या चाहत्याने ‘Ask SRK’ सेक्शनमध्ये “तू सिगारेट सोडलीस का?” असा प्रश्न विचारला होता. या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत शाहरुख म्हणाला, “होय, मी खोटं बोललो…मी स्वत: कॅन्सरच्या धुरात वेढला गेलो आहे.” शाहरुखने दिलेले उत्तर पाहून अनेकांनी ‘थोडी काळजी घे’ असा सल्ला त्याला दिला आहे. तर एका चाहत्याने लिहिले की, ‘तुला काही होणार नाही. तू कायम रहा, कारण जगात प्रेमाची गरज आहे आणि तु नक्कीच ते देत आहे.’
शाहरुखने 2011 मध्ये एका मुलाखतीमध्ये त्याला सिगारेट ओढण्याची प्रचंड सवय असल्याचे म्हंटले होते. याबाबत तो म्हणाला की, “मला झोप येत नाही मी दिवसाला 100 सिगारेट ओढतो. या नादात अनेकदा जेवणही विसरुन जातो आणि पाणीही पित नाही. सिगारेट व्यतिरिक्त मी जवळपास 30 कप ब्लॅक कॉफीचे सेवने करतो. तरीही माझ्याकडे सिक्स पॅक ऍब्स आहेत. त्यामुळे मी स्वत:ची फार काळजी घेत नाही, परंतु काही कारणामुळे किंवा चित्रपटांच्या निमित्ताने माझी काळजी आपोआप कोणाकडून तरी घेतली जाते.”
Yes he lied, surrounded by a thick plume of smoke from his cancer stick!!! https://t.co/GmKlXV296K
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 12, 2023
दरम्यान, शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. पठाणनंतर शाहरुख ‘जवान’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री नयनतारा देखील पाहायला मिळणार आहे. 7 सप्टेंबर 2023 साली रिलीज होणार आहे. याशिवाय शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.