“अण्णा हजारेंना पाठिंबा देऊन माझी चूक झाली’, दिग्दर्शकाचे ट्वीट व्हायरल

मुंबई – देशभरातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवरून असंतोष आहे. दिल्लीत मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शुक्रवारी अण्णांनी आपला निर्णय मागे घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीराज्यमंत्री दोघांनी यासाठी प्रयत्न केले होते.

दरम्यान, अण्णा हजारे यांच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अश्यात आता प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केलेले एक ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. “अण्णा हजारेंना पाठिंबा देऊन माझी चूक झाली’ असं त्यांनी अप्रत्यक्ष पणे म्हंटल आहे.

हंसल मेहता आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “मी ज्या प्रकारे अरविंद यांना पाठिंबा दिला होता त्याच विश्वासाने अण्णा हजारे यांचे समर्थन केले होते. मला या गोष्टीचे दु:ख झाले नाही. कारण आपण सर्वजण चूका करतो. मी सुद्धा सिमरन चित्रपट केला’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले. हंसल मेहता यांनी आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

अण्णा यांनी आपले नियोजित उपोषण मागे घ्यावे यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सहावेळा अण्णांची भेट घेतली होती. मात्र अण्णा आपल्या उपोषणावर ठाम होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.