मुंबई – विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी अहमदनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी केसगळतीवर भाष्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले,’बाबा रामदेव यांनी नखावर नखं घासायला सांगितली. रामदेव बाबा यांचा हा सल्ला फार मनावर घेऊ नका. मी सुद्धा रामदेव बाबांचे ऐकले आणि नखावर नखं घासायला सुरुवात केली मात्र त्यामुळे माझे केस गेले. परत नव्याने येणं तर सोडाच पण होते ते पण गेले.. असं म्हणत ते पुढे म्हणाले,बाबा बुवांचं फार ऐकू नका. महापुरुषांचं ऐका पण या बाबाबुवांना सिरियसली घेऊ नका, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने शेजारील देशांना साखर निर्यात करण्याच्या धोरणाला परवानगी द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उसाला जास्त भाव देता येईल, अशी मागणी अजित पवार यांनी केली. अंबालिका शुगर (ता.कर्जत) येथे आयोजित ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते.