पाटणा : बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी आज आपल्याला आपले आजारी वडील लालूप्रसाद यादव यांना भेटण्याची अनुमती दिली गेली नाही असा आरोप केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे सध्या चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असून त्यांची शारीरिक परिस्थिती ढासळल्याने त्यांच्यावर रांची येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान, तेजस्वी यादव यांनी आपण काल रांची येथे आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी गेलो असता मला आज सकाळपर्यंत तिथंच थांबविण्यात आलं मात्र मला माझ्या वडिलांना भेटण्याची परवानगी दिली गेली नाही. तुरुंगाच्या नियमांप्रमाणे जर सुप्रीटेंडेंट ऑफ पोलीस अधिकाऱ्याची परवानगी असेल तर कैद्याच्या कुटुंबियांना भेटण्याची अनुमती दिली जाते मात्र मला माझ्या वडिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही.
Tejashwi Yadav, RJD: I was in Ranchi yesterday & I was not allowed to meet my father. I kept waiting till the morning, I don't know the reason but as per the jail manual, family members can meet if Superintendent of police wants. A son was not allowed to meet his ailing father. pic.twitter.com/oAWp7SHAAJ
— ANI (@ANI) April 7, 2019