आजच्या काळात प्रेमाची परिभाषाच बदलून गेली आहे. मी तर कोणाशीही अफेअर केलेले नाही. मी स्वतःला कामामध्ये इतके व्यस्त ठेवते की त्यामुळे आणि कदचित भविष्यातही कोणाशीही अफेअर करणार नाही, असे रकुल प्रीत सिंहने म्हटले आहे.
मात्र जर कोणाशी अफेअर करायचेच झाले तर अशा एखाद्या पुरुषामध्ये कोणते गुण असावेत, असा प्रश्न विचारल्यावर रकुलने आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. तो मुलगा छछोर असता कामा नये. त्याला थोडे तरी डोके असायला पाहिजे. जर कोणी फालतूचे प्रश्न विचारून हैराण करत असेल, तर अशा व्यक्तीबरोबर मला कोणतेही रिलेशन ठेवायला आवडणार नाही, असे रकुल म्हणाली. त्या व्यक्तीच्या बोलण्यात काही तरी अर्थ असायला पाहिजे. त्याच्याबरोबर काही तरी सलग्नता असायला पाहिजे, असे रकुल म्हणाली.
मात्र हल्लीच्या जगात प्रेम वगैरे काही शिल्लक राहिले आहे, असे आपल्याला अजिबातच वाटत नाही. त्यामुळे आतापर्यंत त्या भानगडीत न पडल्याचे तिने स्पष्ट करून टाकले. रकुलचा पुढचा सिनेमा एक थ्रिलर असणार आहे आणि त्यामध्ये ती क्रिमिनल लॉयरचा रोल करणार आहे.