मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बॅंक खात्यात दानशूर व्यक्ती तसेच संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन दिवसांत 93 कोटी 5 लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं दोन दिवसांपूर्वी मदतनिधी जाहीर केला. अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं देखील मदतनिधी जाहीर केला आहे.
मी माझं योगदान दिलंय..
शक्य असेल तर तुम्ही ही द्या 🙏🏻#marathikalakarformaharashtra #LetsFightCorona #LetsFightCoronaTogether #WeAreAllInThisTogether #IndiaFightsCorona https://t.co/79rnkjpM1p pic.twitter.com/ByGBWmUHLr
— Sonalee (@meSonalee) March 30, 2020
अमृता खानविलकर
अमृतानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रक्कम देऊ केली आहे. मात्र तिनंदेखील इतर कलाकारांप्रमाणे मदतीचा आकडा जाहीर न करण्याचं ठरवलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी तिचे आभार मानले आहेत. तसेच इतरांनादेखील तिनं मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
बूँद बूँद से सागर भरता है ।@CMOMaharashtra @AUThackeray #CMRF #Covid19India pic.twitter.com/Gcvl19KZQp
— Amruta Khanvilkar (@OfficialAmruta) March 31, 2020
आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
नमस्कार.आपण आपल्या सरकारला या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या क़ोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 31, 2020
त्याचबरोबर विकी कौशल, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, राजकुमार राव, सारा अली खान यांसारख्या कलाकारांनीदेखील मदत निधी देऊ केला आहे.अक्षय कुमारनं २५ कोटींचा निधी दिला आहे तर सलमाननं २५ हजार रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचं ठरवलं आहे.
सढळ हाताने मदत करा
उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19’ या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
बॅंक खात्याची सविस्तर माहिती
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बॅंकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बॅंक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBI0000300