Amruta Khanvilkar New Web Series| अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीसह हिंदी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली. मागील वर्षी प्रदर्शित झालेला तिचा ‘चंद्रमुखी’ चित्रपट चांगलाच गाजला होता. यातील चंद्रा या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. चित्रपटांनंतर आता अमृता नव्या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी चाहते देखील उत्सुक आहे.
अमृता ‘लुटेरे’ या नव्या हिंदी वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. यात अमृता खानविलकर महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. अमृतासोबत रजत कपूर, विवेक गोंबर आणि आमिर अली हे देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. यापूर्वी 6 मार्च रोजी वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘स्कॅम 1992’ आणि ‘स्कूप’ सारख्या सुपरहीट वेबसीरिज देणाऱ्या हंसल मेहता यांची ‘लुटेरे’ ही वेबसीरिज आहे. Amruta Khanvilkar New Web Series|
View this post on Instagram
अमृता खानविलकर लुटेरे वेबसीरिजबद्दल म्हणाली की, ‘एका क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये काम करताना खूप आनंद होत आहे. हंसल सर आणि जय मेहता यांच्या सोबतीने काम करण्यची अनोखी संधी मिळाली आहे. 2024 वर्षातला माझा हा पहिला हिंदी प्रोजेक्ट असून एवढ्या कमालीच्या कलाकारांसोबत काम करण्याचा योगायोग सुद्धा जुळून आला आहे.’
दरम्यान, डिस्ने प्लस हॉटस्टार वर येत्या 22 मार्चला ही सीरिज रिलीज होणार आहे. आगामी काळात अमृता ‘लुटेरे’ सोबतच ‘कलावती’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘ललिता बाबर’ या चित्रपटांमध्येही काम करताना दिसणार आहे. त्यामुळे 2024 हे वर्ष अमृतासाठी खास असल्याचे पाहायल मिळत आहे. तिची नवी वेबसिरिज पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. Amruta Khanvilkar New Web Series|
हेही वाचा:
‘कोणी काहीही केले तरी यादव, मुस्लिम, मागास कुठेही जाणार नाही…’ ; शिवपाल यादव असं का म्हणाले?,वाचा