Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. रामललाच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. मुख्य अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे, परंतु 15 जानेवारीपासूनच पूजा आणि विधी यासारखे कार्यक्रम सुरु होतील. 22 जानेवारी रोजी दुपारी प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा दरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात केवळ पाच लोक उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान असतील. तसेच, RSS प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा समावेश असेल.
22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गज कलाकार आणि नेते मंडळी यांना देखील आमत्रंण देण्यात आलं असून, ‘रामायण’ फेम अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) देखील यावेळी उपस्थित असणार आहेत.
दरम्यान, नुकतंच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत या विषयी बोलताना अरुण गोविल म्हणाले की “मी खूप आनंदी आहे. अनेक वर्षांनंतर आम्हाला ही संधी मिळाली आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांनी खूप काही गमावले आहे, शेवटी आपण श्री रामला पाहू. मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. मी या महिन्यात तीन वेळा अयोध्येला जात आहे.
आता मी तिथे जाईन आणि त्यानंतर 21 जानेवारीच्या रात्री किंवा 22 जानेवारीच्या सकाळी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अयोध्येला पोहोचेन आणि त्यानंतर मी आमच्या आगामी चित्रपट 695 च्या संपूर्ण टीमसह राम मंदिरात जाईन. असं ते म्हणाले. राम मंदिराच्या उभारणीचे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना अरुण गोविल म्हणाले,
‘याचे सर्वाधिक श्रेय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार आणि त्यानंतर ज्यांनी बलिदान दिले त्या सर्व लोकांना द्यायला हवे. आज आम्ही यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. याचे श्रेय या सर्वांना द्यायला हवे.’ असं देखील अरुण गोविल यावेळी म्हणाले.