मला जबाबदारीची भीती वाटते

मल्लिका शेरावत आपल्या भाच्याचे खूप लाड करते. आपल्या बिझी शेड्युलमधून भाचा रणशेरसाठी ती वेळ काढते. कारण तिला स्वतः आई व्हायचं नाही आहे. आई होणे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि आपल्याला ही जबाबदारी पेलवणार नाही, असे मल्लिकाला वाटते आहे. म्हणूनच म्हणूनच आई बनण्याची हौस ती भाच्याचे लाड करण्यात पूर्ण करते आहे.

रणशेर हा आपल्याला आपल्या मुलासारखा वाटतो आहे, असे ती म्हणते. ती रणशेरला आपल्याबरोबर सगळीकडे नेते. त्या दोघांचे खूप चांगले ट्युनिंग देखील जमले आहे. ही बाब आता सगळ्यांना माहीती व्हायला लागली आहे.

काही काळापूर्वी फ्रेंच बिझनेसमन सिरील ऑक्‍सेफन्स बरोबर मल्लिकाचे डेटिंग सुरू होते. मात्र आता ती सिंगल आहे. दोघांमध्ये काय बिनसले हे समजू शकले नाही. आता पुन्हा प्रेमात पडण्यास तयारही झाली आहे. रोमॅंटिक लाईफ संदर्भात तिच्याकडे आणखी काहीही अपडेट नाही. तिला आवडणारा पार्टनर मिळाल्यास लव्ह लाईव्ह एन्जॉय करण्याची तिची तयारी आहे.

काही दिवसांपूर्वी “बू सबकी फटेगी’ या वेबसिरीसमध्ये मल्लिका दिसली होती. आता “तुम्हारी प्यारी सुनिता’ या सिनेमात ती रजत कपूर बरोबर दिसणार आहे. दीर्घ काळ फिल्म इंडस्ट्रीपासून आणि सोशल मीडियापासूनही दूर राहिल्याने तिला थोडी शांतता एन्जॉय करता आली. या काळात ध्यान आणि योगाभ्यासाचा अभ्यास तिने केला होता. योगासने करतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड ही झाले होते. तिच्या मानसिकतेमध्ये आता खूप खूप बदल झाल्याचं दिसून येतं आहे. कदाचित त्यामुळेच तिला जबाबदारीचे भान आले असावे. पण जबाबदारी स्वीकारण्यास ती अजूनही तयार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)