लग्नानंतरच्या करिअरमध्ये ऐश्वर्या मागेच

लग्नानंतर बहुतेक अभिनेत्री ब्रेक घेतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र अलिकडच्या ट्रेंडनुसार विद्या बालन, करीना कपूर आणि राणी मुखर्जी यांनी या नियमाला अपवाद दिला आहे. या तिघीही बॉलिवूडमध्ये अजूनही ऍक्‍टिव्ह आहेत. त्यांचे नवीन नवीन सिनेमे यायला लागले आहेत. दशकभरापूर्वी आघाडीची ऍक्‍ट्रेस असलेली ऐश्वर्या राय-बच्चन हिने मात्र या शर्यतीतून माघार घेतली आहे. आराध्याची आई झाल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीसोडून दिल्याचेच दिसते आहे.

यापूर्वी नितू सिंग, मंदाकिनी, नम्रता शिरोडकर, भाग्यश्री पटवर्धन, गायत्री जोशी, ट्‌विंकल खन्ना, मीनाक्षी शेषाद्री आदी आघाडीच्या ऍक्‍ट्रेसनी लग्नानंतर ऍक्‍टिंग करिअर सोडून दिले आहे. विद्या, करीना आणि राणी मुखर्जी यांनी मात्र आपले करिअर सुरू ठेवले आहे. अर्थात माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि काजोल यांनी आपले करिअर लग्नानंतरही सुरूच ठेवले होते. पण त्यांनी रोमॅंटिक रोल करणे सोडून दिले होते.

करीना कपूर आता “गोरी तेरे प्यार में’ आणि “इंग्लिश मीडियम’मध्ये लीड रोल करते आहे. विद्या बालन आता शकुंतलादेवी आणि एम एस सुब्बुलक्ष्मी यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. तिचा “मिशन मंगल’ला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. राणी मुखर्जीचा “मर्दानी 2′ देखील लवकरच येतो आहे. मात्र ऐश्वर्याचा कुठेही पत्ता नाही. करिष्मा आणि काजोल देखील आता विश्रांती घेण्याच्या मूडमध्ये असाव्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.