Bollywood News । 2004 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मर्डर’ हा चित्रपट सर्वांना आठवत असेल. या चित्रपटात मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मीची जोडी खूप गाजली. दोघांच्या लव्ह मेकिंग सीनची बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी कधीही चित्रपटात काम केले नाही. पण निर्माता आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मल्लिका आणि इमरान हाश्मी एकत्र दिसले. चाहत्यांसाठी ही एखाद्या व्हिज्युअल ट्रीटपेक्षा कमी नाही. 20 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावरची ही हिट जोडी पाहून चाहते खूप खूश आहे.
या पार्टीत इमरान हाश्मीने काळ्या रंगाचा सूट तर मल्लिका शेरावतने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. दोघांचे व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.ते अचानक एकमेकांना भेटले आणि नंतर एकमेकांना मिठी मारल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर दोघांनी पापाराझींनाही अनेक पोज दिल्या. त्यांना पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा चाहते व्यक्त करत आहे.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर लोक कमेंट करत आहे आणि म्हणत आहेत की या दोघांना एकत्र बघायला सर्वांना आवडेल. मोठ्या पडद्यावर हिट जोडी बनल्यानंतर इमरान हाश्मीने मल्लिका शेरावतबद्दल मोठे वक्तव्य केले होते. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये त्याने मल्लिका शेरावतला बॅड किसर म्हटले होते.
मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांचा ‘मर्डर’ हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कलाकारांचे अनेक बोल्ड सीन्स होते.
हे वाचले का ? सुप्रीम कोर्टाची बनावट वेबसाइट; 1.83 लाखांचा गंडा