हैद्राबाद बलात्कार प्रकरण: ‘ते’ चारही नराधम ठार

पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपींचा मृत्यू

हैदराबाद : हैदराबादमध्ये पशुवैद्यकिय डॉक्‍टरवर बलात्कार करून पीडितीला जाळून मारण्यात आले. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, आज सकाळी या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

चौकशी दरम्यान, पोलिस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून हे आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबारी केली. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हैद्रबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली होती. पीडितेच्या हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला होता.

प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितीवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितीवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियांकाला टॉर्चर केल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.