पुणे(प्रतिनिधी) – सिंहगड परिसरात पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) सायंकाळी घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पतीला ताब्यात घेण्यात आले .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती हा एका पावडर कोटींग कंपनीत काम करतो. तर पत्नी एका खासगी कंपनीत काम करत होती. मात्र लॉकडाऊनमुळे ते गेल्या दोन महिन्यांपासून घरीच होते. त्यांचा 8 ते 9 वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगी आहे. ते धायरी परिसरात कुटुंबासोबत राहण्यात होते.
दरम्यान, पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात वाद होत असत. आज सायंकाळी झाल्यानंतर पत्नीवर पतीने चाकूने वार केले. घटनेची माहिती मिळताच सिहंगड रोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक शेळके व त्यांच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली.