पत्नीचा खून करणाऱ्या पतीला आजन्म कारावास

खून करून तो स्वत: पोलीस स्टेशनला झाला होता हजर

पुणे – चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून करणाऱ्या आजन्म कारावासाची शिक्षा सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी सुनावली. याबरोबरच त्याला पाच हजार रुपये दंड भरावा लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे खून करून तो स्वत: वारजे पोलिसांत झाला हजर.

 

 

राजू दुसाने (रा. आकाशनगर, वारजे) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने पत्नी सविता यांचा खून केला होता. 30 जानेवारी 2015 रोजी झालेल्या या घटनेबाबत विनोद दाभाड यांनी फिर्याद दिली होती. या खटल्याचे कामकाज सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. परिस्थितीजन्य पुरावा आणि साक्षीदाराने त्याला घराची कडी लावून बाहेर जाताना पाहिल्याची साक्ष महत्त्वाची ठरली.

 

 

घटनेच्या एक महिना आधी सविता यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. हा फोन आल्याचे दुसाने याने पाहिले होते. तेव्हापासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण केली. तसेच एक दिवस सविता यांच्या साडीचा पदर पेटवून दिला होता. त्यांच्या मुलीने ती आग विझविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

 

दुसाने दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.