पर्यटन विभागाच्या व्हिडिओग्राफी स्पर्धेला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

राज्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी मोहिम

मुंबई – महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आयोजित केलेल्या “व्हिडिओग्राफी स्पर्धेला’ उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असल्यामुळे राज्य सरकारच्या पर्यटन विभागातर्फे 15 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या “व्हिडीओग्राफी स्पर्धे’ला अधिक मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. जे लोक यात भाग घेऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी ही खास पर्वणी ठरू शकते. कारण आता 15 मार्च 2021 पर्यंत इच्छुक स्पर्धक व्हिडीओग्राफी स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवू शकतात.

महाराष्ट्रातील भव्य किल्ले, मंदिरे, ऐतिहासिक इमारती, मंत्रमुग्ध करणारे समुद्र किनारे आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा, वन्यजीव, अभयारण्ये यांचा वारसा तुम्ही बनविलेल्या व्हिडिओतून अधिक लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या पर्यटनाचे पैलू पोहोचवतील. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन अधिक विकसित होण्यास मदत होईल.

तुमच्या सृजनशीलतेच्या नजरेतून स्मार्ट फोन आणि कॅमेराच्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ आणि तुमच्या कलेला एक उत्तम व्यासपीठ ही स्पर्धा मिळवून देत आहे. या स्पर्धेकरिता हौशी, छंद जोपासणारे, व्यावसायिक, वयस्क किंवा जगात कुठेही राहत असलेली इच्छुक व्यक्ती या व्हिडिओग्राफी स्पर्धेत कोणीही निशुल्क प्रवेश करू

शकतो. निवडून आलेल्या प्रत्येक व्हिडिओ साठी दोन हजार रुपयांच बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिक तपशील मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा, तसेच दुसरी लिंक वापरुन आपली प्रवेशिका पाठवावी, असे आवाहन पर्यटन विभागामार्फत करण्यात आले आहे.
http://www.maharashtratourism.gov.in/MAHA-videography-contest
https://bit.ly/2LFuFEs

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.