Hunger strike of ST employees | महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनावाढ देणे, सातवा वेतन आयोग लागू करण्यासह दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतील श्रमिक तासांसंदर्भातील परीपत्रक क्र. 1/2024 रद्द करण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि. 13) पासून दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेच्या गेटसमोर एस.टी. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु आहे.
उपोषणस्थळी एस.टी. कामगार संघटनेचे प्रा. सचिव संदिप रायकर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय अध्यक्ष किशोर आंबटकर, विभागीय सचिव विजय माने, कार्याध्यक्ष अरविंद गोडबोले, खजीनदार सागर ठिकेकर, तसेच बालाजी पांचाळ, सत्यनारायण कांबळे, स्वप्नील बुटाला, रमेश शिंदे, मारूती मांढरे, हरिभाऊ शेळकंदे, विजय शिंगाडे, सुमंत पोतदार, ज्ञानेश्वर हाडंबर यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
सरकारने या बेमुदत उपोषणाची योग्य दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी यावेळी दिला आहे.