Narayan Rane VS Manoj Jarange Patil – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सभा घेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर कडवट हल्ला चढवला आहे. ‘मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ते काहीही बडबड करत आहेत. त्यांनी मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा केवळ जागेवरून हलून दाखवावे. । Narayan Rane VS Manoj Jarange Patil
त्यानंतर आम्ही त्यांनाी असली मराठ्यांची ताकद दाखवू’, असे ते म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांनी आता मर्यादा ओलांडली असल्याचा आरोप देखील नारायण राणे यांनी केला आहे.
या संदर्भात नारायण राणे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. । Narayan Rane VS Manoj Jarange Patil
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !’ । Narayan Rane VS Manoj Jarange Patil