मंचर -आंबेगाव तालुक्याचा दहावीचा निकाल 98.53 टक्के लागला आहे. 54 शाळांपैकी 32 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. एकूण 2 हजार 947 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 2 हजार 902 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती गटशिक्षण अधिकारी पोपटराव महाजन यांनी दिली.
100 टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाणे –
भीमाशंकर विद्यामंदिर (शिनोली), विद्या विकास मंदिर (अवसरी बुद्रुक), श्री मुक्तादेवी विद्यालय (नारोडी), पंडित जवाहरलाल नेहरू तथा दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विद्यालय (निरगुडसर), शिवशंकर विद्यालय (आंबेगाव), संत ज्ञानेश्वर विद्यालय (चास), शासकीय आश्रमशाळा (गोहे बुद्रुक), श्री भैरवनाथ विद्यालय (शिंगवे), जगदिशचंद्र महिंद्रा हायस्कुल (चिंचोली), शासकीय शाळा (तेरुंगण), सोमनाथ विठ्ठल नवले विद्यालय (भावडी), हनुमान विद्यालय (गंगापूर बुद्रुक), शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालय (लांडेवाडी), भैरवनाथ विद्यालय (गिरवली), डी. जी. वळसे पाटील विद्यालय (आंबेगाव), कृष्णा यशवंत बलचिम माध्यमिक विद्यालय (माळीण), न्यु इंग्लिश स्कुल (जांभोरी),
मुमताज ंअहमदखान उर्दु हायस्कुल (मंचर), श्री मुक्ताई प्रशाळा (पिंपळगाव घोडे), लाल बहादुर शास्त्री विद्यालय (आमोंडी), न्यु इंग्लिश स्कुल (बोरघर), श्रीरंग व्ही. गभाले मराठी विद्यालय (मोहरेवाडी), शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय (डिंभे), काळभैरवनाथ आणि सौ. लक्ष्मीबाई बांगर विद्यालय (खडकी), हिरकणी विद्यालय (गावडेवाडी), शासकीय आश्रमशाळा (असाणे), यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय (आंबेगाव वसाहत), प्रगती विद्यालय (वडगांव पीर), न्यु इंग्लिश स्कुल (गोहे खुर्द), न्यु इंग्लिश मीडियम स्कूल (घोडेगांव), अनुसुचित जाती – नवबुद्ध (पेठ), शासकीय इंग्लिश मीडियम आश्रमशाळा या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.