पुणे – सिंहगड संस्थेच्या विविध शाळांची 100 टक्के निकालाने उत्तम कामगिरी करत यशाची कमान कायम राखली आहे. एरंडवणा येथील सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत प्रथम-जान्हवी नरके (88.60 टक्के), द्वितीय – कृष्णांशु खिलारे (86.40 टक्के), तृतीय- यशश्री बराटे (84 टक्के) याप्रमाणे विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे.
कोंढापुरी येथील आर.एम.डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमध्ये प्रथम- प्रियांशी चव्हाण (89.40 टक्के), द्वितीय- रोहित पाटील (87.20 टक्के), तृतीय -दक्ष फाळके व अदिती हरदास (81.60 टक्के) याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. चांदिवली येथील शाळेत प्रथम- पूजा यादव (87.80 टक्के), द्वितीय- देविका चौधरी (84 टक्के), तृतीय – आर्शिया खान ( 81.40 टक्के) आदींनी उत्तम गुण प्राप्त केले आहेत. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.एम.एन.नवले व संस्थापक सचिव डॉ.सुनंदा नवले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.