पुणे – पुण्यात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. यातच आता पुणे विद्यापीठ रोडवर पुण्याकडे जाताना वाहनांची प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ब्रेमेन चौक ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे वाहतूक अतिशय सावकाश पुढे सरकते आहे. अनेक वाहने या परिसरात अडकली आहे. सकाळी कामाला जाण्याच्या वेळी या ठिकाणी वाहनांच्या मोठ -मोठ्या रांगा लागल्याने नागरिकही हैराण झाले आहेत.
वाहतूक कोंडीत अडकलेल्या बसमधील प्रवासी देखील चालत कामाच्या ठिकाणी जात आहे. पाऊस आणि बंद सिग्नल यामुळे ब्रेमेन चौक ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे.