हुवावेचा तिढा आणि मोबाइलधारक (भाग-२)

हुवावेचा तिढा आणि मोबाइलधारक (भाग-१)

हुवावे कंपनीला आता ऍन्ड्रॉईडच्या पब्लिक व्हर्जनचा वापर करावा लागेल. गुगलचे ऍन्ड्रॉईड ओपन सोर्स प्रोजेक्‍ट कोणीही वापरू शकते. संपूर्ण जगामध्ये 2.5 अब्ज उपकरणे या प्रोजेक्‍टसह ऍक्‍टीव्ह आहेत. गुगल या प्रोजेक्‍टमध्ये इतर लोकांना तांत्रिक सहाय्य देईल पण हुवावे कंपनीला ही सवलत मिळणार नाही. हुवावे या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय पावले उचलते हे पाहावे लागेल.

वास्तविक ट्रम्प चीनशी व्यापारयुद्ध करत असले तरीही त्याची झळ आता सर्वांनाच बसते आहे. काही काळापूर्वी चिनी उत्पादनांवर 25 टक्के कर लावल्याने अमेरिकन लोकांना खूप महागड्या दराने चिनी सामान खरेदी करावे लागले. कारण चिनी सामानाला तत्काळ कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. ऍपलसारख्या अनेक कंपन्या त्यांच्या हार्डवेअर निर्मितीचे काम चीनमध्ये करतात. चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर द्यायचे ठरवले तर ऍपलसारख्या कंपन्यांच्या उत्पादनांवर प्रभाव पडला तर काय होईल हे सांगणे कठीण आहे. ह्या कमतरतेच्या भरपाईची जोखीम अमेरिकेत कोणतीही कंपनी घेणार नाही. कारण निर्बंध किती काळ लागू होणार आहेत याचा काहीच अंदाज नाही. एका रात्रीत कोणत्याही गोष्टीचे उत्पादन सुरू करणेही शक्‍य नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वतःच एक व्यावसायिक आहेत त्यामुळे या सर्व पैलूंचा विचार त्यांनीही केला असेल. मात्र त्यांच्या अनेक निर्णयाचा फटका म्हणून जगाच्या व्यापारात जी अनिश्‍चितता निर्माण झाली आहे त्यातून बाहेर पडण्याचा उपायही त्यांना लवकरच शोधावा लागणार आहे.

– अपर्णा देवकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)