मुंबई – बॉलीवूड स्टार हृतिक रोशनसोबत फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने नवीन जाहिरात कॅम्पेन सुरू केले. पण आता ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गदारोळ वाढत असल्याचे पाहून झोमॅटोने आपले कॅम्पेन मागे घेतली, मात्र सोशल मीडियावर हृतिक रोशनविरोधात लोकांचा रोष उफाळून आला आहे. ह्रितिकने माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडियावर सातत्याने केली जात आहे. या संपूर्ण वादावर हृतिकने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
झोमॅटोने नुकतीच एक जाहिरात मोहीम सुरू केली ज्यामध्ये त्यांनी हृतिक रोशनला स्टार म्हणून साइन केले. जाहिरातीत हृतिक रोशन म्हणतोय की, त्याला भूक लागली होती, म्हणून त्याने महाकालकडे थाळी मागितली. यावरून नुकताच गोंधळ सुरू झाला. उज्जैन महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी याचा निषेध नोंदवला आणि झोमॅटो आणि हृतिक रोशनला तत्काळ माफी मागण्याचे आवाहन केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन झोमॅटोने सर्व जाहिराती मागे घेतल्या आणि त्यांच्यावतीने स्पष्टीकरण देखील जारी केले.
Ujjain: Mahakal priest condemns Zomato’s ‘thali’ ad featuring Hrithik Roshan, seeks withdrawal, apology
Read @ANI Story | https://t.co/AnUUfeJMuc#Zomato #Mahakaltemple #HritikRoshan pic.twitter.com/lQUCN5W9wD
— ANI Digital (@ani_digital) August 21, 2022
झोमॅटोने सांगितले की त्यांनी जाहिरातीमध्ये ज्या प्लेटबद्दल बोलले आहे ती उज्जैनमधील महाकाल रेस्टॉरंटची आहे, महाकालेश्वर मंदिराची नाही. या जाहिरातीचा मंदिराशी काहीही संबंध नाही. तसेच जाहिरातीत या रेस्टॉरंटचा उल्लेख केला आहे कारण ते उज्जैन शहरातील सर्वात मोठे ऑर्डर घेणारे रेस्टॉरंट आहे. त्यांच्या मेनूमध्ये थाळी सर्वात जास्त आवडीचा मेन्यू आहे.
#Boycott_zomato@Zomato, which serves non-veg, wants to run its business by ironing the Prasad Thali of the holy Mahakal temple of Hindus.
Now..
So wake up my Hindu brave brothers..
And show Zomato and Hrithik Roshan their rightful place“हिंदुओ से दुनियादारी
बन जाओगे भिखारी” pic.twitter.com/hwSlpCkzi3— Raghunath Dhobale (@hindus_right) August 21, 2022
झोमॅटोने जाहिरात वादात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण आता लोक सोशल मीडियावर हृतिकच्या माफीची वाट पाहत आहेत.अलीकडेच हृतिक रोशनने सोशल मीडियावर लाल सिंग चड्ढा चित्रपट लोकांनी पाहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. झोमॅटोच्या जाहिरातीमुळे ह्रितिकला मात्र ट्रॉलर्सचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला.