आधार कार्ड हरवल्यास Re- print कसे कराल..

कोणत्याही सरकारी कामांसाठी सध्या आधारकार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे एक महत्वपूर्ण ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्वाचे आहे. पण काही कारणास्तव तुमचे आधार कार्ड हरवले तर चिंता करू नका, कारण युआयडीएआयने आधार कार्ड हरविल्यास ते पुन्हा रि-प्रिंट करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

UIDAI च्या नियमानुसार, ग्राहकांकडे त्यांचा रजिस्टर मोबाइल नंबर किंवा ईमेल असणे अत्यंत गरजेचे आहे. या नंबरव्दारा हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळू शकते. परंतू ग्राहकांकडे तेही नसल्यास ग्राहकाला आधारकार्ड रि-प्रिंट करता येऊ शकते.पण यासाठी रूपये (स्पीड पोस्ट आणि जीएसटी) शुल्क आकारण्यात येते.

आधार रि-प्रिंटसाठी स्टेप्स :

1)सर्वप्रथम यूआयडीएआय च्या अधिकृत वेबसाईट www.uidai.gov.in ओपन करा.
2) वेबसाईटच्या होमपेजवरील Get Addhaar सेक्‍शनमधील Order Aadhaar Reprint या पर्यायावर क्‍लिक करा.
3) त्यानंतर आधार नंबर, तिथे दिसणारा सिक्‍यूरिटी कोड आणि Request OTP वर क्‍लिक करा.
येथे दोन पर्याय तुमच्यासमोर असतील- जर तुमच्याकडे रजिस्टर मोबाईल नंबर नसेल तर Do not have Register Moboile Number वर टीक करून सध्याचा नंबर टाकावा लागेल. त्यानंतर Send OTP क्‍लिक करावे.
4) त्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेला OTP उजवीकडील ओटीपी बॉक्‍समध्ये टाका.
(ओटीपी टाकल्यानंतर आधार कार्डचा प्रिव्यू दिसेल. हा प्रिव्यू रजिस्टर मोबाईल ग्राहकधारकांनाच दिसेल.)
5)यानंतर Make Payment वर क्‍लिक करावे. तुम्ही रूपयाचे शुल्क डेबिट/ क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग किवा यूपीआय व्दारे भरू शकता.
6)पेमेंट (शुल्क) यशस्वी झाल्यानंतर एक डिजीटल सिग्नेचरवाली रिसिप्ट मिळेल, जी तूम्ही पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता तसेच याची माहिती तुम्हाला SMS व्दारे दिली जाते.
7) त्यानंतर आधारकार्डवरील पत्यांवर तुम्हाला आधारकार्ड प्राप्त होऊन जाईल. (आधारकार्ड बदल डिलीव्हरी स्टेटसही तूम्ही मिळवू शकता.)

-स्वप्निल हजारे

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)