Aadhaar Card – जेव्हा तुम्ही तुमचे आधार कार्ड कुठेही वापरता तेव्हा एक रेकाॅर्ड तयार केले जाते ज्यामध्ये तुमचा आधार कुठे आणि कोणत्या उद्देशासाठी वापरला गेला याची माहिती असते. या रेकाॅर्डवरुन तुम्ही तुमचे आधार कार्ड दुसरे कोणी वापरत तर नाही ना याची माहिती मिळवू शकता. या रेकाॅर्डवरुन तुमचे आधार कार्ड कोठे वापरले गेले आहे हे कळू शकते. ते ऑनलाइन कसे तपासायचे ते जाणून घ्या..
सर्वप्रथम तुम्ही uidai वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. येथे तुम्हाला ‘Aadhaar Authentication History’ चा पर्याय दिसेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. हा पर्याय तुम्हाला My Aadhaar सेक्शनमध्ये दिसेल. याशिवाय तुम्ही https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history या लिंकवर क्लिक करून थेट जाऊ शकता.
यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल. आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि नंतर सिक्युरिटी कॅप्चा टाका आणि ओटीपी पाठवा वर क्लिक करा. यानंतर आधारसोबत नोंदणीकृत तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
ओटीपी सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तुमचे आधार कार्ड कधी आणि कुठे वापरले गेले याची संपूर्ण माहिती मिळेल, हे रेकॉर्ड फक्त गेल्या सहा महिन्यांसाठी उपलब्ध असेल. हे रेकॉर्ड मिळाल्यानंतर, आपण आधारचा वापर केला आहे की नाही हे तपासू शकाल. हे तपासणे आवश्यक आहे कारण इतर कोणीही तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करु नये.