‘मुख्यमंत्र्यांनी ३ तासाच्या कोकणदौऱ्यात किती गावांना भेटी दिल्या ?’

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सडकून टीका

रत्नागिरी :  राज्यातील कोकण किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. याचपार्श्वभूमीवर चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी दौरा करत असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. त्यावर चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. यावर आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.

नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ

‘देवेंद्र फडणवीसजी काय राव तुम्ही…थेट दुष्काळी भागात लोकांच्या मदतीला पोहोचता…मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना.. ३ तासाच्या कोकणदौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या किती सात्वंन केलं, हे सगळ कृपा करून विचारू नका..आणि हो पर्यटन फोटोसेशन ३ तासात शक्य नाही म्हणून रद्द केलं आहे.’ असा आरोपही चित्र वाघ यांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.