Lok Sabha Elections 2024| लोकसभा निवडणुकी 2024 साठी भाजपाने काही दिवसांपूर्वी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काल शुक्रवारी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात एकूण 39 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीतील 15 उमेदवार सर्वसाधारण गटातील असून 24 उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा अल्पसंख्याक समाजातील आहेत. या यादीत एका मुस्लिम उमेदवाराचाही समावेश आहे.
काँग्रेसचे मुस्लिम उमेदवार कोण ?
काँग्रेसने लक्षद्वीपमधून मोहम्मद हमदुल्ला सईद यांना तिकीट दिले आहे. गेल्या वर्षीही ते या जागेवर पक्षाचे उमेदवार होते, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मागील वेळेस अगदी काही फरकाने सईद यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांना काँग्रेसकडून संसदेत जाण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे. मोहम्मद हमदुल्ला सईद वयाच्या 26 व्या वर्षापासून निवडणूक लढवत आहेत. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लक्षद्वीपमधून पहिल्यांदा निवडणूक जिंकली.
मात्र, 2014 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019 मध्येही त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली, मात्र विजय मिळवता आला नाही. आता चौथ्यांदा तिकीट मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सईद हा पेशाने वकील आहे. तर त्यांच्या पत्नी डॉ. आमना मिर्झा या सहाय्यक प्राध्यापक आहेत. सईद यांची दुसरी पत्नी तस्लिमा ही होम मेकर आहे.
तरुण उमेदवारांना संधी Lok Sabha Elections 2024|
काँग्रेसने पहिल्या यादीत 39 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी 7 असे आहेत, ज्यांचे वय 71 ते 76 या दरम्यान आहे. 12 उमेदवारांचे वय 61-70 वर्षे आणि 8 उमेदवारांचे वय 50-60 वर्षांच्या दरम्यान आहे. त्याच वेळी, 12 उमेदवार आहेत ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत काँग्रेसने तरुण नेत्यांवर मोठा विश्वास व्यक्त केला आहे.
राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा मैदानात Lok Sabha Elections 2024|
राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून पुन्हा मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे, छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामध्ये केरळमधील सर्वांधिक 16 उमेदवारांचा समावेश आहे.
केरळपाठोपाठ कॉंग्रेसने कर्नाटकमधील 7 उमेदवार जाहीर केले. कॉंग्रेसने छत्तिसगडमधील 6 उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामध्ये बघेल यांचे नाव विशेष ठरले आहे. ते राजनांदगावमधून लढतील. तेलंगणातील 4 उमेदवार पक्षाने जाहीर केले. त्याशिवाय, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि लक्षद्वीपमधील उमेदवारांचा समावेश कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत करण्यात आला आहे.
हेही वाचा:
sara ali khan । सारा अली खानच्या पोटावर दिसल्या भाजलेल्या खुणा; चाहत्यांनी केली चिंता व्यक्त
“आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?”; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांची खोचक प्रतिक्रिया