मुंबई – मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री ‘केतकी चितळे’ ही तिच्या अभिनयापेक्षा वेगळ्याच कारणाने नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. केतकीच्या काही अशाही पोस्ट आहेत ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. आता पुन्हा एकदा तिने आपल्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती ‘जातीयवाद, सनातनी हिंदू’ अशा प्रकारचा मुद्दा मांडला आहे.
तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रावर ही पोस्ट शेअर केली आहे. आता तिची ही इंस्टाग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आपल्याला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्री केतकी चितळे हिने सडेतोड उत्तर देत शिवीगाळ केल्याचं दिसून आलं आहे.
View this post on Instagram
केतकीने देखील नवीन वर्षाच जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. आणि याच पार्टीचा एक व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘माफ करा पण कधीही विसरू नका… हॅप्पी न्यू इयर’ असं म्हणत दारू पितानाही दिसतेय. तसेच तिने या व्हिडिओ खाली “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ.. लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100 % गलत है..” असं कॅप्शन देखील दिल आहे.
दरम्यान, तिच्या याच व्हिडिओ आणि कॅप्शन वरून एका नेटकाऱ्यानी तिला ट्रोल करत ‘हिंदू आहेस ना, मग न्यू इअरला हिंदू देवाला हात जोडतात… तू दारू पिताना व्हिडीओ का काढतेस… खूप तरुण मुलं तुला फॉलो करत आहेत. काही चांगलं लोकांसमोर ठेव हीच अपेक्षा..’ असं कमेंट मध्ये लिहलं आहे.
मात्र, या नेटकऱ्याला उत्तर देताना केतकीने शिवीगाळ केली आहे. “येड** इसमा… हे ग्रेगोरियन नववर्ष आहे. पंचांगानुसार नवीन वर्ष नाही. अर्थात तुमच्या पिढीला हा साधा फरक माहित असण्याची अपेक्षा ठेवणं हा माझा मूर्खपणा आहे’. असं केतकी या नेटकाऱ्याला म्हणाली आहे.