मुंबई – अभिनेता रितेश देशमुखचा वेड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रितेशच्या या सिनेमातिला एका गाण्याने अख्या बॉलीवूडला वेड लावल्याचे पाहायला मिळालं होत. कॉलेज तरुणाईला भुरळ घालणारा वेड हा सिनेमा प्रेम आणि नात्यावर भाष्य करणारा आहे. रितेशसोबत या सिनेमात त्याची पत्नी जेनेलिया देखील आहे. चित्रपटातील मला वेड लावलाय हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.आता या गाण्यावर काही फॉरेनर इंफ्युयेनसर देखील नाचताना दिसत आहेत.
‘वेड लावलय’ हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं आहे की अनेकांकडून सोशल मीडियावर याच्या रिल्स केल्या जात आहेत. बॉलिवूड कलाकारांनी तर या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.यानंतर डान्सिंग डॅड म्हणून प्रसिद्ध असलेल्या परदेशी डान्सरने देखील यावर डान्स केलाय. हा व्यक्ती देशभरातील विविध गाण्यावर डान्स करत असतो. विशेष म्हणजे याने सेम रितेश प्रमाणे स्टेप्स करत वेड लावलय गाण्यावर डान्स केला आहे.
View this post on Instagram
रिकी पॉन्डनं असं या व्यक्तीच नाव असून त्याने आपल्या मुलासोबत या गाण्यावर केलेला डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या अगोदर देखील एका कोकणी गाण्यावर डान्स केला होता. सलमान खान आणि रितेशची जबरदस्त केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळते. म्हणूनच हे गाणं खूप पॉप्युलर झालय. वेड हा सिनेमा ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला असून नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळताना दिसतोय.