आजचे भविष्य (गुरुवार, दि.२१ जानेवारी २०२१)

मेष : नोकरीत वरिष्ठ कामाची दखल घेतील. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. आत्मविश्‍वास वाढेल.

वृषभ : छोटा समारंभ साजरा कराल. नवीन संधी आकर्षिक करतील. प्रियजन आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.

मिथुन : मनाला दिलासा देणारे ग्रहमान लाभल्याने निश्‍वास टाकाल. महिलांना मनःशांती मिळेल.

कर्क : व्यवसायात नेहमीच्या कामाचा तणाव असेल तरीही त्याची पर्वा करणार नाही. छोटीशी ट्रीपही काढाल.

सिंह : आर्थिक स्थिती चांगली राहिल्याने अनेक बेत पूर्ण होतील. जोडधंदा असणाऱ्यांना संधी उपलब्ध होईल.

कन्या : वेळेचे गणित मांडून कामे उरका. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील व जादा सवलत देतील.

तूळ : नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात शुभ समाचार कळेल. वेळ मजेत जाईल.

वृश्‍चिक : ग्रहमान अनुकूल असल्याने तुमच्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळेल. नवीन योजनांना मुहूर्त लाभेल.

धनु : अनेक बेत साकार करण्यासाठी पावले उचलाल. व्यवसायात वेळेत कामे पूर्ण केलीत तर फायदा होईल.

मकर : प्रतिष्ठित व्यक्‍तींच्या भेटीचे योग येतील. नोकरीत विशिष्ट कामासाठी परदेशगमनाची संधी मिळेल.

कुंभ : व्यवहारांना चालना मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. सांसारिक जीवनात आनंद देणारी बातमी कळेल.

मीन : सुवार्ता मनाला उभारी देईल. प्रकृतीमान सुधारेल. मुलांना अभ्यासास पूरक ग्रहमान लाभेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.