सातारा: जिल्ह्यात 53 नागरिकांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह

सातारा – जिल्ह्यात काल (दि. 19) रात्री जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, आणखी 53 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये करोनामुळे एकही मृत्यू झाला नसून बाधितांचे प्रमाणही घटले.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात सदरबझार, मल्हार पेठ प्रत्येकी दोन, इतरत्र तीन, कराड तालुक्‍यात विद्यानगर एक, फलटण तालुक्‍यात खुंटे एक, माण तालुक्‍यात जाशी आठ, गोंदवले बुद्रुक दोन, गोंदवले खुर्द, लोधवडे, नरवणे, कासारवाडी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात कोरेगाव आठ, रहिमतपूर तीन, चंचळी, जळगाव, पळशी, त्रिपुटी प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्‍यात शिरवळ सहा, खंडाळा एक, जावळी तालुक्‍यात कुडाळ एक, महाबळेश्वर तालुक्‍यात लिंग मळा, तायघाट, पाचगणी प्रत्येकी एक, वाई तालुक्‍यात कवठे दोन, इतर एक, असे एकूण 53 नागरिक करोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.