वळसंग: कुंभारी येथील लखन संजय काळे यांच्या या घरात मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून प्रवेश करून अज्ञात चोरट्यांना घरातील 48 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.
गेल्या दोन दिवसात ही चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे. चोरट्यांना घरातील सोन्याचा हार, एलईडी टीव्ही, आणि पाणी तापवण्याचा बंब, होम थिएटर असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी कुंभारीचे हवालदार सय्यद पुढील तपास करीत आहेत.